पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण
पृथ्वीचे परिवलन

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.
पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी बरोबर एक दिवसात अथवा २४ तासात एक फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. प्रति दिवशी हा फरक ८६,०००(२४ तासांचे सेकंद)/३६५.२५(एका वर्षातील दिवस) = ३ मिनिटे ५६ सेकंद एवढा असतो.
पृथ्वीचे परिभ्रमण
पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वी एका वर्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते.
References
https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वीचे_परिवलन
https://mr.wikipedia.org/wiki/पृथ्वीचे_परिभ्रमण
पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडेच का फिरते..?
ReplyDeleteपृथ्वी फिरते पण आपण पृथ्वीबरोबर फिरल्याचं आपल्याला जाणवत का नाही
ReplyDeleteअंतराळात पृथ्वीच्या परिवलनाचा वेग ताशी किती किमी असतो
ReplyDeleteguppy fish
ReplyDeleteGuppy fish farm
Sarivalan Fish
खाली का पडत म्ही हे सगळे
ReplyDeleteपृथ्वीचा परीभ्रामनचे परिणाम काय होत
ReplyDeleteपृथ्वीच्या परिवलनाचा वेग ताशी किती किमी असतो ?
ReplyDelete